कायदेशीर दस्तऐवज

नियम आणि अटी

Terms & Conditions

शंभूराजे मोटर्स अँड फायनान्स कन्सल्टंट द्वारे प्रदान केलेल्या सेवा वापरताना ग्राहक खालील अटींचे पालन करण्यास बांधील राहतील. खाली प्रत्येक कलम (Clause) सविस्तर दिले आहे — गरज असल्यास वरील यादीतून थेट त्या कलमावर जा.

सर्वसाधारण माहिती

शंभूराजे मोटर्स अँड फायनान्स कन्सल्टंट द्वारे प्रदान केलेल्या सेवा वापरताना ग्राहक खालील अटींचे पालन करण्यास बांधील राहतील.

वाहन खरेदी-विक्री व सल्ला

  • संस्था केवळ ग्राहक आणि विक्रेता/बँक यांच्यातील दुवा (Consultant) म्हणून काम करते.
  • वाहनांची स्थिती आणि कागदपत्रांची पडताळणी करणे ही ग्राहकाची प्राथमिक जबाबदारी असेल.
  • व्यवहार पूर्ण झाल्यानंतर वाहनामध्ये उद्भवणाऱ्या कोणत्याही तांत्रिक बिघाडासाठी संस्था जबाबदार राहणार नाही.

फायनान्स आणि कर्ज प्रक्रिया

  • कर्ज मंजूर करणे किंवा नाकारणे हा सर्वस्व अधिकार संबंधित बँक किंवा फायनान्स कंपनीचा असेल.
  • ग्राहकाने दिलेली कागदपत्रे खरी असणे अनिवार्य आहे. चुकीच्या माहितीमुळे कर्ज नाकारले गेल्यास संस्था जबाबदार नसेल.
  • कर्ज प्रक्रियेसाठी लागणारे सरकारी शुल्क किंवा प्रोसेसिंग फी ही नॉन-रिफंडेबल (परत न मिळणारी) असेल.

कमिशन आणि सेवा शुल्क

  • ठरलेले कन्सल्टन्सी शुल्क किंवा कमिशन हे व्यवहार निश्चित झाल्यावर त्वरित देय असेल.
  • एकदा दिलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही.

आरटीओ (RTO) प्रक्रिया

  • वाहन हस्तांतरण प्रक्रियेसाठी लागणारा वेळ हा आरटीओच्या नियमांनुसार असेल.
  • कागदपत्रांमधील त्रुटींमुळे प्रक्रिया लांबणीवर पडल्यास संस्था त्यास जबाबदार नसेल.

न्यायालयीन क्षेत्र

काही वाद उद्भवल्यास, त्याचे निराकरण स्थानिक न्यायालयीन (पुणे/वाकड) कार्यक्षेत्रात केले जाईल.

टीप: आमच्या सेवा वापरणे म्हणजे तुम्ही वरील सर्व अटींशी सहमत आहात असे मानले जाईल.

कोणती शंका असल्यास संपर्क करा

9284014141